जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा, पं. स. सेलू, जि. प. वर्धा | यु डायस कोड २७०८०७०७००१
आमची वेबसाईट
आम्ही बालउद्योजक
आमचे ऑनलाईन दुकान
All Products
नवोपक्रम
‘तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे भाषिक कौशल्यांचा विकास’
- निपुण भारत अभियानाच्या यशस्वितेकरिता. . .
प्राथमिक स्तरावर इयत्ता तिसरी पर्यंत विद्यार्थ्यांनी वाचायला व लिहायला शिकणे आणि मूलभूत कौशल्य आत्मसात करणे अपेक्षित आहे. इयत्ता तिसरी नंतर बालकांनी शिकण्यासाठी वाचणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास त्या बिंदूपासून अध्ययनाचे अंतर वाढत जाते, कारण नंतरच्या इयत्ता मध्ये भाषेच्या पाठ्यपुस्तकातील मजकूर, भाषिक संबोध अधिक जटिल आणि अमूर्त होत जातात. त्यामुळे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये वरील भाषिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक होते. त्यासाठी ‘तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे भाषिक कौशल्यांचा विकास’ - निपुण भारत अभियानाच्या यशस्वितेकरिता. . . हा नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्यांचा विकास करणे गरजेचे वाटले.
- श्री. स्वप्नील मारोतराव वैरागडे
नवोपक्रम अंतर्गत उपक्रम
अभिव्यक्ती ब्लॉग
Learning Experience
Learning Experience
थेट शाळेच्या बाकावरून | मुलाखत क्र. ६: मा. नरेशजी काळबांडे (शेतकरी , महाबळा )
थेट शाळेच्या बाकावरून . . . मुलाखत क्र. ५: मा. नंदा पाटील (अंगणवाडी सेविका )
"थेट शाळेच्या बाकावरून" | मुलाखत क्र. ३ : माजी सैनिक मा. मुकेशजी भावरकर
थेट शाळेच्या बाकावरून . . . मुलाखत क्र. १: मा. आशा तळवेकर (अंगणवाडी सेविका )
थेट शाळेच्या बाकावरून . . . मुलाखत क्र. ४ : मा. गीता वाघमारे (आशा वर्कर )
Canopy Climb Adventure."
Learn about Giant African Snail.mp4
थेट शाळेच्या बाकावरून . . .मुलाखत क्र. -2 (आशा वर्कर )
मुलाखत - थेट शाळेच्या बाकावरून . . .
नवोपक्रमाची यशस्विता
'तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे भाषिक कौशल्यांचा विकास' यांना नवोपक्रमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर होता. भाषिक कौशल्य विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा येथील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक अधिकारी वर्ग, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ञ, शिक्षण प्रेमी यांनी केले. वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली. भाषासारख्या विषयांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग हा कौशल्य विकासासाठी केला जात आहे याबद्दल वर्धा जिल्ह्याचे मा. शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथील प्राचार्य मा. डॉ. मंगेश घोगरे, मार्गदर्शक डॉ. उर्मिला हाडेकर तसेच इतर अधिव्याख्याता, पंचायत समिती सेलू मधील गटशिक्षणाधिकारी मा. जयपाल राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी मा. संगीता महाकाळकर, केंद्रप्रमुख मा. सोर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सदर नवोपक्रम राबविल्यानंतर अनेक व्यक्तींच्या सकारात्मक प्रतिक्रिया भ्रमणध्वनी द्वारे प्राप्त झाल्या. पालक सभेमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. शाळेतील प्रत्येक कार्यक्रम व कार्यक्रमातील संचालन, आभार प्रदर्शन, भाषण यामध्ये आता विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. शाळेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सानिका वांदिले या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. उपस्थित गावकऱ्यांनी या मुलीचे कौतुक केले. सदर नवोपक्रम राबविल्यामुळे उद्दिष्ट प्राप्त झालीच परंतु नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीचा पट वाढला. सदर उपक्रमाची फल निश्चिती साध्य झाल्यानंतरही अनेक पालकांनी हा उपक्रम चालू ठेवावा अशी विनंती केली. या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी मुलांना उत्साह निर्माण झाला. या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्यांचा विकास घडवून आणला आहे. कृतीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न या नवपक्रमामुळे झालेला आहे. सदर उपक्रमाद्वारे निपुण भारत अभियानाची भाषिक कौशल्य साध्य होण्यास मदत झाली. या उपक्रमामुळे इतरही शाळांना मूलभूत भाषिक कौशल्य साध्य करण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.
उपक्रमाची नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही करण्यापूर्वी मनात खूप शंका निर्माण झाल्या होत्या. परंतु आपण वेगळा उपक्रम राबवत आहोत याचा आनंद मनात होता. या नवोपक्रमाच्या कार्यवाहीनंतर माझी अस्वस्थता दूर झाली. माझ्या नवपक्रमाच्या अखेरीस चांगले परिणाम दिसून आल्याने मी समाधानी आहे. यातून अनेक चांगल्या गोष्टीही मला शिकण्यास मिळाल्या.
कोणतीही कार्य मन लावून केल्याने त्यास निश्चिती यश मिळते हे यातून अनुभवावयास मिळाले. असा हा "तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे भाषिक कौशल्यांचा विकास" नवोपक्रम मला एक नवा आनंद देऊन गेला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे."
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळा, केंद्र कोटंबा, पंचायत समिती सेलू जिल्हा परिषद वर्धा या शाळेची स्थापना सन १९४९ रोजी झाली. या शाळेत एकूण एक ते चार इयत्ता आहेत. शाळेत दोन शिक्षक व ४७ विद्यार्थी आहेत. शाळा ही अगदी गावाच्या टोकाला आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. शाळेमध्ये ई लर्निंग साहित्याच्या मदतीने विद्यार्थी अध्ययन करतात. सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन गोष्टी शिकून घेतात.
- धावपटू
शालेय वार्ता
सक्षम पाटील या विद्यार्थाला तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शाळेतर्फे सक्षमचे अभिनंदन !
सुविचार
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
- महात्मा ज्योतिबा फुले