दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ला आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला होता. दोन वर्ष आधी पर्यंत बाल आनंद मेळावा म्हणजे काय हे आम्हाला ठाऊकच नव्हते. परंतु आता आम्हाला बाल आनंद मिळावा हा आमचा एक उत्सव वाटू लागला.
नमस्कार मी तनुष्का मंगेश चांभारे इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा. यावर्षीच्या बाल आनंद मेळाव्याच्या फूड स्टॉल मध्ये खूप मज्जा आली. मी फूड स्टॉल मध्ये ज्वारीचे पापड, फिंगर व कच्चा चिवडा विक्रीसाठी ठेवला होता. या विक्रीतून मला 210 रुपये प्राप्त झाले. माझ्यासोबत इतरही विद्यार्थ्यांनी आपापले फूड स्टॉल लावलेले होते. यामध्ये रुद्राक्षने गुपचूपचा स्टॉल लावला होता. युतीकाने ढोकळे आणले होते. ट्विंकलने ब्रेड पकोडे विक्रीसाठी आणले होते. अशा पद्धतीने समोसा, इडली, दोसा भजे, पोहे, मटकी, आलूचे पराठे, पालकचे पराठे, फ्रेंच फ्राईज, मॅगी अशा प्रकारची विविध खाद्यपदार्थ या स्टॉलमध्ये ठेवण्यात आलेले होते. गावातील गावातील नागरिक इतर विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी आमच्या स्टॉल वरील पदार्थ खरेदी केले. आम्ही सुद्धा पदार्थांचा आस्वाद घेतला. या स्टॉलच्या माध्यमातून आम्हाला खरेदी - विक्रीचा व्यवहार समजला. पदार्थ कसे बनवायचे ते समजलं तसेच आपली वस्तू कशी विकायची हे सुद्धा आम्हाला यातून समजले. हे पदार्थ बनवण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी पासूनच तयारी केली यामध्ये आमच्या आईने खूप मदत केली तसेच काहींच्या वडिलांनी व मोठ्या बहिणीने सुद्धा मदत केली. त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद ! याच दिवशी आमच्या शाळेमध्ये पालक सभा आयोजित करण्यात आली होती. आमच्या पालकांनी आमच्या स्टॉलची खूप स्तुती केली.
Yorumlar