चंदूची मौज - संस्कृती गोमासे
- संस्कृती जीवन गोमासे
- Apr 12, 2024
- 1 min read

नमस्कार, थेट शाळेच्या बाकावरून मी संस्कृती जीवन गोमासे इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळा येथील आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे राजूची मौज. राजू स्वप्नात नदी काठी खेळण्यास गेला. नदीत वाहत असलेली एक लाकडी पेटी त्याला दिसली. राजू ने पेटी धरून ती उघडली. अरे , बापरे बाळा घाबरू नकोस, मी देवदूतआहे. मला तुझा मित्र समज. बोल बाळा, तुला काय करावेसे वाटते. मला आकाशात चांदोमामा बरोबर खेळावे असे वाटते. चल आपण चांदोमामा कडे जाऊ. चांदोमामा आपण खेळ खेळूया का ? हो ! चल आपण शिवा शिव खेळ खेळू. तार्यावर बसून फिरण्यास किती गंमत येते. माझ्याबरोबर लपंडाव खेळायची देखील तू मजा घे. देवा आता मला घरी जावेसे वाटते. तुझ्या बरोबर खूपच मजा आली. आपला खूप आभारी आहे. पुन्हा परत जरूर जरूर या. बरे येतो पुन्हा भेटू. धन्यवाद !
תגובות