एकदा एका आंब्याच्या झाडाला असा आंबा लागला होता की, जो इतर आंब्यापेक्षा वेगळा होता. तो आंबा रसाळ आणि चवदार होता. तो आंबा विचार करू शकत होता आणि बोलू शकत होता.
एक दिवस आंब्याने विचार केला आज आपण फिरायला जाऊ का ? खूप मजा येईल. सगळे मला बघून आश्चर्यचकित होईल. तो आंब्याच्या झाडावर खाली पडला आणि रस्त्यावरून घसरत पुढे गेला रस्त्यात त्याला एक ससा भेटला. तो आंब्याला म्हणाला, "अरे थांब मला तुला खायचं", आंबा म्हणाला "तू मला नाही खाऊ शकत, मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे पण जाणार, मग तू मला कसा खाणार." असं म्हणून आंबा जोरात उड्या मारत पळू लागला. ससा सुद्धा त्याच्या मागे जोरात जोरात पळू लागला. पळता पळता ससा म्हणाला, "अरे आंब्या पळाला तर मी वेगवान आहे मी पकडून तुला नक्कीच खाऊ शकतो." आंबा म्हणाला, "हो हो ठीक आहे. तू जेवढ्या वेगाने पळत आहे त्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकतो." पळता पळता ससा थकून गेला आणि तो परत आपल्या बिळात निघून गेला.
तेव्हा एक लहान अनंत नावाच्या मुलांनी त्याला बघितले आणि त्याला म्हणाला, "अरे अरे थांब मला तुला खायचं." आंबा म्हणाला, "तू मला नाही खाऊ शकत. मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे जाणार मग तू मला कसा खाणार." आंबा वेगाने पळू लागला आणि त्याच्या मागे लहान मुलगा सुद्धा पळू लागला. तेवढ्यात एक बाई आली आणि म्हणाली, "हा किती रसाळ आंबा आहे. मला हा आंबा खावासा वाटतो." आंबा म्हणाला, "तू मला नाही खाऊ शकत मी तर जादूचा आंबा आहे मी पुढे पुढे पळणार मग तू मला कशी खाणार." तेव्हा एक शिकारी आला आणि तो म्हणाला मला पण या आंब्याची चव घ्यायची आहे. आंबा म्हणाला, "मी तर जादूचा आंबा आहे मी पुढे पुढे पळणार मग तू मला कसा पकडणार आणि कसा खाणार" तसाच तो आंबा जोरात पळू लागला आणि त्याच्या मागे तो मुलगा, बाई, आणि शिकारी असे सगळे पळू लागले. पळून पळून तो आंबा थकून गेला आणि म्हणाला मी या गावातच लपून बसतो म्हणजे मला कोणी पकडू शकणार नाही. थकून तो आंबा तिथेच झोपून गेला. तो आंबा काही दिवस तिथेच पडून राहिला आणि एक दिवस तो सुकून सडून गेला. आणि त्याला कीडही लागली. आता तो विचार करू लागला, अरेरे मी कोणाचा तरी स्वादिष्ट जेवण बनलो असतो पण माझ्या गर्वाने मला नष्ट केले, आता मी कुणाच्या खायच्या लायकीचा राहिलेला नाही. मनातल्या मनात तो खूपच पश्चाताप करीत होता. आपल्या जादुई शक्तीचा त्याच्या गर्वाने तो तिथेच नष्ट झाला.
तात्पर्य: आपल्या सौंदर्याचा गर्व करणे अत्यंत वाईट गोष्ट आहे.
Khup chan