अनेक दिवसांपासून आम्ही मॅडम आणि सरांना सहल नेण्यासाठी आग्रह करीत होतो. कारण यावर्षी या शाळेतले आमचे शेवटलं वर्ष होतं.
नमस्कार मी संस्कृती जीवन गोमासे इयत्ता चौथी मध्ये शिकते. आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा येथे इयत्ता एक ते चौथीच्या वर्गापर्यंतची आहे. पुढल्या वर्षी मी दुसऱ्या शाळेत शिकायला जाणार. त्यामुळे यावर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत व माझ्या मित्र मैत्रिणींसोबत सहलीला जाण्याची ही शेवटलीच वेळ असणार. माझ्या आग्रहास्तव सर व मॅडम यांनी वॉटर पार्क ला जाण्याचे निश्चित केले. आमच्याच गावाशेजारी म्हणजे कान्हापूर येथे Wave वॉटर पार्क आहे. तिथे जाण्याचे आम्ही निश्चित केली व 10 जानेवारी 2024 ला आमची सहल वॉटर पार्क येथे गेली.
आम्ही वॉटर पार्क मध्ये एस. टी. बसणे गावावरून निघालो तिथे गेल्यावर आमचे फोटो काढण्यात आले. आमच्या हाताला बँड सुद्धा बांधण्यात आले.त्यानंतर सर्वप्रथम आम्हाला वॉटर पार्क मध्ये काही सूचना दिल्या. तसेच स्विमिंग कॉस्च्युम घालण्याच्या आधी आम्हाला तिथे नाश्ता देण्यात आला. नंतर आम्ही कॉस्च्युम घालून पाण्यामध्ये गेलो. इथे विविध प्रकारच्या घसरपट्ट्या, जम्पिंग, सि स्वा असे अनेक साहित्य ठेवलेले होते. सोबत पाणी पण होते या पाण्यासोबत घसरण्याची, पाण्यामध्ये खेळण्याची खूप मज्जा आली. येथील झाडे खूप सुंदर होते येथे लॉन सुद्धा होते. तसेच झुलण्यासाठी झोपाळा व जम्पिंग करण्यासाठी काही साहित्य ठेवलेले होते. काही काळ म्हणजे दोन ते तीन तास पाण्यात खेळल्यानंतर आम्हाला जेवण्यासाठी बोलवण्यात आले. आम्ही घरून आणलेले टिफिन येथे खाल्ले. जेवल्यानंतर आम्ही पुन्हा पाण्यामध्ये गेलो व तिथे खूप मज्जा केली. मग आमची घरी जाण्याची वेळ झाली होती आणि आम्ही आमचे कपडे बदलले व बाहेर जाण्यासाठी एका रांगेत उभे झालो. वॉटर पार्क सोडण्याआधी आम्हाला कच्चा चिवडा देण्यात आला. कच्चा चिवडा खाऊन आम्ही बस मध्ये बसलो आणि आमच्या गावला सायंकाळी पाच वाजेपर्यंत परत आलो.
ही सहल आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशी सहल राहणार आहे. आम्हाला या सहलीमध्ये खूप मज्जा आली.
Comentários